अहमदनगर : दोन मोटारसायकलचा अपघात होवून यात प्रिती संतोष म्हस्के या १३ वर्षांच्या मुलीचा मृत्यू तर भानुदास केशव खराडे हे जखमी झाले आहेत.
ही घटना दि.९ ऑक्टोबर रोजी कुळधरण गावच्या शिवारातील इंडियन ऑईल पेट्रोल पंपासमोर घडला असून, याप्रकरणी महेश बबन कुलथे (रा.दुरगाव,ता.कर्जत) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर असे की, भानुदास केशव खराडे हे त्यांची नात प्रिती संतोष म्हस्के हीला मोटारसायकलवरून कापरेवाडी येथे घेवून जात होते.यावेळी समोरून महेश बबन कुलथे हा त्याच्या ताब्यातील (एमएच १६ सीएम १९३१) ही मोटारसायकल भरधाव वेगात चालवून खराडे यांच्या मोटारसायकलला धडक दिली.
यात प्रिती ही दुचाकीवरून उडून पडल्याने तिचा मृत्यू झाला तर भानुदास खराडे हे जखमी झाले आहेत. या प्रकरणी मच्छिंद्र केशव खराडे यांच्या फिर्यादीवरून कर्जत पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत अधिक तपास पोहना.नागरगोजे हे करत आहेत.
- 200MP कॅमेरा + 7600mAh बॅटरी! iQOO 15R चार वर्षे अगदी नवा राहणारा फोन !
- 7000mAh बॅटरी, 50MP ट्रिपल कॅमेरा, 100W फास्ट चार्जिंग, iQOO 15 वर धमाकेदार डिस्काउंट
- रेल्वेसाठी मोठा पॅकेज, वंदे भारत स्लीपर ट्रेनसह अमृत भारत रेल्वेचा विस्तार
- विजय सेल्समध्ये iPhone 16 आता अर्ध्या किमतीत-Limited Offer, एक्सचेंज आणि बँक डिस्काउंटसह उपलब्ध
- साध्या लोकलचे एसी लोकलमध्ये रूपांतर; तिकीट दर किती? आराखड्यासाठी आयआयटीची नियुक्ती













