अशोक चव्हाण म्हणतात मी महाराष्ट्रात खूश…

Published on -

नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना अखिल भारतीय काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव बनविण्याची व मध्य प्रदेशच्या प्रभारी पदाचीही जबाबदारी देण्याची तयारी केली आहे; परंतु चव्हाण यांनी या दोन्ही जबाबदाऱ्या स्वीकारण्यास नकार देत आपण महाराष्ट्रात खूश आहोत, आपल्याला राज्यातच ठेवावे, असे म्हटले असल्याचे वृत्त आहे.

याबाबतच्या माहितीनुसार, लोकसभा निवडणुकीत पक्षाला मिळालेल्या अपयशाची जबाबदारी स्वीकारत अशोक चव्हाण यांनी काँग्रेसचे तत्कालीन अध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडे आपल्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता.

त्यांचा राजीनामा स्वीकारून त्यांच्या जागी बाळासाहेब थोरात यांची निवड करण्यात आली. राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी करायची असेल तर प्रदेशाध्यक्ष बदला, असा सल्ला शरद पवार यांनी राहुल गांधींना दिला होता.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe