पण सत्ता तुमची, तुम्ही काय दिवे लावलेत

Ahmednagarlive24
Published:

राहुरी : देशाचे गृहमंत्री २० वेळा महाराष्ट्रात येतात आणि शरद पवारांनी काय केले? असा सवाल करतात. पण सत्ता तुमची, तुम्ही काय दिवे लावलेत ते सांगा. मी मुख्यमंत्री असताना महिलांना ५० टक्के आरक्षण दिले.

यांनी छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाची घोषणा केली, मात्र स्मारकाची वीटसुद्धा रचली नाही, यात पाच वर्षं सरली.

महाराष्ट्रातील किल्ल्यांत सरकार हॉटेल्स उभी करून तिथे छम छम वाजवणार आहे का? हा एकप्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करण्याचा प्रयत्न आहे.

मुख्यमंत्री म्हणतात, कुस्ती एकतर्फी होणार आहे, पण कदाचित त्यांना माहीत नसावे मी कुस्ती परिषदेचा अध्यक्ष आहे, असा टोलाही खा. शरद पवार यांनी लगावला. माळशिरस विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी उमेदवाराच्या प्रचार सभेत खा. पवार बोलत होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment