पोलिसास धक्काबुक्की

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर : वाहतुकीचे नियमन करत असलेल्या पोलिस कर्मचाऱ्याने वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्यास सांगितल्याचा राग येवून त्यास शिवीगाळ केल्याची घटना जामखेडमध्ये घडली.

याप्रकरणी नागेश अशोक गवळी, अशोक मारूती गवळी या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर असे की, रॅलीमुळे झालेली वाहतूक कोंडी कमी करत असताना वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्याचे सांगितल्याने नागेश अशोक गवळी व अशोक मारूती गवळी या दोघांनी पोलिस कर्मचारी यादव जीवन चव्हाण यांना अश्लील भाषेत शिवीगाळ करून त्यांना धक्काबुक्की करून कर्तव्यावर असलेल्या अधिकाऱ्यांशी झटापट केली.

याप्रकरणी चव्हाण यांच्या फिर्यादीवरून या दोघांविरूध्द सरकारी कामात अडथळा आनल्याचा गुन्हा दाखल केला आहे.याबाबत अधिक तपास सपोनि.चव्हाण हे करत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment