अहमदनगर :- गुरुवारी रात्री नगर – सोलापूर रस्त्यावर नगर तालुक्यातील साकत गावाजवळ मालट्रक व क्रुझर गाडीचा अपघात होऊन क्रुझरमधील नऊ प्रवासी जखमी झाले आहेत. अपघातानंतर मालट्रकचालक वाहनासह पळून गेला आहे.
क्रुझर जीपचालक नागेस गणपत आदलिंगे, श्रीधर शिवाजी माळी, कोमल श्रीधर माळी, महादेव हरिश्चंद्र माळी, अजित जनार्दन क्षीरसागर, तृप्ती अजित क्षीरसागर, कान्होपात्रा सुदर्शन यादव, सुदर्शन महावीर यादव, गोपाळ भरत हंडे, एकनाथ हरिश्चंद्र माळी अशी जखमींची नावे असून,
सर्व जण सोलापूर जिल्ह्यातील मार्डी येथील रहिवासी आहेत.
दोन जणांच्या पाय व हाताला गंभीर दुखापत झाली असून, इतर किरकोळ जखमी झाले असल्याची माहिती नगर तालुका पोलिस स्टेशनकडून मिळाली.
अपघातानंतर मालट्रकचालक वाहनासह निघून गेला. त्यानंतर जखमींना उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.
नगर-सोलापूर महामार्गावर पावसामुळे मोठ-मोठ खड्डे पडलेले आहेत. त्यामुळे खड्डे हुकविण्याच्या प्रयत्नात या मार्गावर अपघात होत आहे.या प्रकरणी ट्रकचालकाविरुद्ध नगर तालुका पोलिस स्टेशनला गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
- नगर जिल्ह्यात आहे असे एक गाव जिथे प्लॅस्टिकच्या कपात चहा मिळणार नाही !
- Big Breaking ! श्रीगोंद्यात शासकीय यंत्रणेच्या सहाय्याने जमीन विक्री; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल
- 8 वा वेतन आयोग : शिपाई, शिक्षक, ते आयएएस अधिकारी कोणाला किती मिळणार पगार ?
- 8th Pay Commission : 10 वर्षांची प्रतीक्षा संपली ! सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात होणार इतकी वाढ
- दुसऱ्याच्या कर्जाला गॅरेंटर बनण्याआधी दहा वेळा विचार करा! नाहीतर येईल कपाळाला हात मारण्याची वेळ