नगर : नगररचना विभागात महापालिकेने महिनाभरापूर्वी नियुक्त केलेल्या कर्मचार्यांना अखेर कामकाजाचे वाटप करण्यात आले आहे. महिनाभर हे कर्मचारी बदलीच्या ठिकाणी केवळ बसून होते. आयुक्तांनी ही बाब गांभीर्याने घेतल्यानंतर कामकाज वाटपास वेग आला. यामुळे येथील कामाला वेग येण्याची शक्यता आहे.
नगररचना विभागात गेल्या अनेक वर्षांपासून काही कर्मचारी तळ ठोकून बसले होते. काही कर्मचारी तीस तर काही वीस वर्षांपासून एकाच विभागात एकाच टेबलवर काम पाहत होते. त्यातील काहींच्या बदल्या करण्याचा प्रयत्न मध्यंतरी करण्यात आला.

file photo
मात्र त्यांनी बदलीनंतर रजा टाकून प्रशासनावर दबाव आणत पुन्हा नगररचना विभागात तोच टेबल मिळविला. पदाधिकारी, नगरसेवक आणि अधिकारी यांच्या हातमिळवणीने नगररचनातील मक्तेदारी संपुष्टात आणणे कठीण झाले होते.
- Mutual Fund SIP मुळे कोट्यधीश! फक्त 10,000 गुंतवून झाली तब्बल 1,68,00,00,000 ची कमाई ! जाणून घ्या संपूर्ण माहिती
- मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर मोठा बदल ! ‘मिसिंग लिंक’ कधी होणार सुरू ? प्रवास वेळ ३० मिनिटांनी कमी !
- पुणे PMPML चा ऐतिहासिक निर्णय ! महिलांसाठी मोफत बस सेवा…पुण्यात कोणते मार्ग फ्री असणार? चेक करा
- बँकेची महत्त्वाची कामं बाकी आहेत? उशीर करू नका! मार्चमध्ये या तारखांना बँका बंद राहणार – पूर्ण यादी पाहा
- अहिल्यानगर जिल्ह्याला लवकरच मिळणार आणखी एक आमदार !