बनावट सातबारा तयार करुन फसवणूक

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर :- बनावट कागपत्र तयार करुन भूविकास बँक व महसुल कर्मचार्‍यांनी संगनमतीने वडिलोपार्जित साडे नऊ एकर शेतजमीन बनावट सातबारा तयार करुन फसवणूक केल्याचा आरोप शेतकरी नंदू विधाते यांनी केला आहे.

चार वर्षापासून वेळोवेळी पाठपुरावा करुन देखील न्याय मिळत नसल्याने उपोषण करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. नंदू विधाते यांचे वडिल नाना उर्फ वसंत विधाते यांच्या मालकीची नगर-औरंगाबाद महामार्गावरील जेऊर येथे रस्त्यालगत साडेनऊ एकर जमीन आहे.

त्यांच्या वडिलांनी १९८५ मध्ये बँकेचे कर्ज फेडण्यासाठी जमीन विक्रीचा निर्णय घेतला होता. परंतू कराराचा भंग करुन मध्यस्ती असलेले भूविकास बँकचे अधिकारी व महसुलचे तत्कालीन कर्मचाऱ्यांनी बनावट कागदपत्राच्या आधारे खरेदीखत करुन घेतले.

त्यावेळचे गट नंबर १८६ क्षेत्र १ हेक्टर ८ आर व गट नं. १८९ क्षेत्र २ हेक्टर ८ आर क्षेत्राच्या उताऱ्यावर बँकेचे नाव असताना बँकेचे नाव काढून खोटा सातबारा उतारा तयार करण्यात आला. तर तत्कालीन तलाठी साक्षीदार होऊन निबंधकांपुढे खरेदीखत करुन घेतले असल्याचा आरोप नंदू विधाते यांनी केला आहे.

या फसवणुकीची २०१६ मध्ये माहिती झाल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालय, सीएम पोर्टल, प्रांत व तहसिलदार, मंडलाधिकारी व सध्याचे तलाठी यांच्याकडे तक्रार नोंदवण्यात आली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment