दोन गटात हाणामारी; १८ जणाविरूध्द गुन्हा दाखल

Published on -

नगर – सावेडीत दोन गटात हाणामारी झाली. याप्रकरणी परस्परविरोधी फिर्यादीवरून तोफखाना पोलिस ठाण्यात दोन्ही गटातील १८ जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेत तिघे जखमी झाले आहेत.

लाकडी दांडके, लोखंडी रॉड, दगड , विटाने हाणामारी करण्यात आली. याप्रकरणी विरेन मधूकर भिंगारदिवे, आकाश शालूमन जाधव, मधूकर दयानंद भिंगारदिवे, विलास दयानंद भिंगारदिवे, पदमा विलास भिंगारदिवे, कलावती शाह भिंगारदिवे,

सिंधू मधूकर भिंगारदिवे, राणी मधूकर भिंगारदिवे, राजस शालूमन  जाधव, राकेश दादू भिंगारदिवे, श्रीकांत चंद्रकांत आल्हाट, महादू लक्ष्मण भिंगारदिवे, रंजना चंद्रकांत आल्हाट, सीमा उर्फ पिंकी निकाळजे, आशा दादू भिंगारदिवे,

रेणुका महादू – भिंगारदिवे, दीपक फकीरा पवार, आकाश फकीरा पवार (सर्व  रा. सावेडी) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक हारूण मुलानी यांनी घटनास्थळी भेट दिली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe