अहमदनगर गारठले, राज्यातील सर्वात कमी तापमान नगरमध्ये !

Ahmednagarlive24
Published:

नगर जिल्ह्यातून पावसाने अखेर निरोप घेतला असून थंडीचे आगमन झाले आहे. सलग पाचव्या दिवशी महाबळेश्वरपेक्षा सर्वात थंड तापमान अहमदनगर मध्ये नोंदवले गेले. 

रविवारी राज्यात सर्वात कमी किमान तापमान नगरमध्ये 14.6 अंश सेल्सिअस होते. त्यात आणखी घट होत सोमवारी 14 अंश सेल्सिअसपर्यंत आले.

सर्वात थंड समजल्या जाणार्‍या महाबळेश्वरमध्ये किमान तापमानाची नोंद 15.6 अंश सेल्सिअस झाली. जिल्ह्यात थंडीचा पारा खाली आल्याने रात्रीच्या वेळी शेकोट्या पेटविल्याचे चित्र दिसत आहे.

सकाळी कान टोपी व स्वेटर असे उबदार कपडे घालून नागरिक बाहेर पडताना दिसत होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment