ओला दुष्काळ जाहीर करा

Published on -

अकोले :- तालुक्यात गेल्या काही महिन्यांपासुन सुरू असलेल्या संततधार पावसामुळे तालुक्यातील शेती उध्द्वस्त झाली असून हातातोंडाशी आलेली पिके सडून चालली आहेत. यामुळे शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. 

त्यामुळे तालुक्यात ओला दुष्काळ जाहिर करून तातडीने पंचनामे करून शेतक ऱ्यांना शासनाने भरपाई द्यावी,अशी मागणी अकोले तालुका काँग्रेस पार्टीच्यावतीने कार्याध्यक्ष बाळासाहेब नाईकवाडी यांनी केली आहे.

प्रशासनाला दिलेल्या निवेदनात पुढे म्हटले आहे कि, अकोले तालुक्याची भौगोलिक परिस्थिती प्रतिकूल असून आदिवासी डोंगराळ भाग तसेच पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर पडलेला पाऊस अजूनही बंद होण्याचे नाव घेत नाही. त्यामुळे शेतीमालाचे लाखो रुपयांचे न भरून येणारे नुकसान झाले आहे.

तालुक्याच्या दक्षिण व उत्तर भागात कांदा, मका, बाजरीसह भाजीपाला, टोमॅटो, मिरची आदिवासी पट्ट्यात देखील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तालुक्यातील बहुतांश शेतकरी हा निरक्षर असल्याने ते पिक विम्याबाबत जागरूक नसतात.

त्यामुळे हे नुकसान नैसर्गिक आपत्ती समजुन शासनाने तातडीने पंचनामे करावेत व पिक विम्याबाबत असलेल्या अटी व शर्ती शिथील करून शेतक ऱ्यांना न्याय मिळवुन द्यावा असे आवाहन काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे.


महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!