भिंगार : लोकप्रतिनिधीच्या नाकर्तेपणामुळे भिंगार शहर मागे पडले आहे. येत्या काळात येथील पाणीप्रश्न सोडविण्यासाठी व भिंगारचा ‘ड’ वर्ग नगरपालिकेत समावेश व्हावा, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे शिवसेना उमेदवार अनिल राठोड यांनी सांगितले.
पुढे बोलताना राठोड म्हणाले की शिवसेना-भाजपा युतीच्या काळात भिंगारमध्ये अनेक कामे झाली. आपण आमदार असताना भिंगारच्या विकासासाठी स्मशानभूमीची संरक्षक भिंत, विविध भागात हँडपंप, हायमॅक्स, बाजारतळावर डांबरीकरण, पेव्हींग ब्लॉक, व्यायामशाळा आदी प्रश्न मार्गी लावले.

राठोड यांच्या प्रचारार्थ भिंगार शहरातून प्रचारफेरी काढण्यात आली. याप्रसंगी माजी महापौर अभिषेक कळमकर, माजी शहरप्रमुख संभाजी कदम, जिल्हा परिषद सदस्य शरद झोडगे, भिंगार शहरप्रमुख सुनिल लालबोंद्रे, नगरसेवक प्रकाश फुलारी, रवि लालबोंद्रे, संजय छजलानी, महेश नामदे, अर्जुन दातरंगे, अनिल लोखंडे, विशाल वालकर,
विष्णू घुले, नामदेव लंगोटे, दत्ता जाधव, प्रशांत गायकवाड, कांता बोठे, प्रशांत डावरे, प्रतिक भंडारी, सचिन जाधव, चेतन शहापुरकर, अक्षय भांड, सुरज गोहेर, सुदर्शन गोहेर, अमोल छजलानी, निलेश साठे, अजित माळवदे, शुभम खराडे आदी उपस्थित होते.
अनिल राठोड म्हणाले की, पुढील काळात भिंगार शहर व कॅन्टोंन्मेंटचा पाणी प्रश्न, भुयारी गटार योजना, महिला बचत गटांच्या माध्यमातून महिलांना रोजगार, आरोग्य सेवा आदी प्रश्नांसह भिंगारचा ‘ड’वर्ग नगरपालिकेत समावेश व्हावा, यासाठी प्रयत्न करणार आहोत.
केंद्रात भाजप-सेनेची सत्ता असल्यामुळे या प्रश्नांसाठी आपण स्वत: पाठपुरावा करु. भिंगारकरांनी महायुतीच्या पाठिशी उभे रहावे, असे आवाहन त्यांनी केले. दरम्यान, प्रचारफेरी दरम्यान महिलांनी राठोड यांना औक्षण करुन त्यांचे स्वागत केले. प्रचारफेरीवर पुष्पवृष्टी करण्यात आली.
- गर्भनिरोधक गोळ्या आणि स्ट्रोकचा संबंध – महिलांसाठी धोक्याची घंटा!
- Mutual Fund Investment : शेअर बाजारातील अस्थिरता वाढली ; म्युच्युअल फंड गुंतवणुकीत मोठी वाढ
- अहिल्यानगरमध्ये मस्साजोग ! अपहरण केलं ,फ्लॅटवर डांबलं,चेंबरमध्ये मारहाण, व्हिडीओ आणि डोंगरावर जाळलं…
- महाराष्ट्रातील 100 वर्ष पेक्षा अधिक काळ रखडलेला ‘हा’ Railway मार्ग प्रकल्प आता 45 दिवसात मार्गी लागणार ! सर्व्हे पण झाला सुरू, कसा आहे रूट?
- शाळकरी विद्यार्थ्यांसाठी आताची सर्वात मोठी बातमी ! High Court चा मोठा निर्णय, आता….