माजी आमदार अनिल राठोडांची वाटचाल बिकट

Ahmednagarlive24
Published:

नगर: नगर शहर विधानसभेची जागा भाजपला मिळावी यासाठी ठराव केलेला आहे. नगर शहराची जागा भाजपलाच मिळावी, अशी आमची मागणी आहे. दरम्यान, शिवसेनेला जागा दिली, तरी राठोड यांच्या उमेदवारीला आमचा विरोध असेल असे माजी खासदार तथा भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष दिलीप गांधी यांनी स्पष्ट केले आहे.

निमित्ताने शिवसेना व भाजपचा संघर्ष उफाळून येण्याची चिन्हे आहेत. मुख्यमंत्री देवंद्र फडणवीस महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने शुक्रवारी (१३ सप्टेंबर) नगरमध्ये येणार आहेत. या पार्श्वभूमीवर शहर भाजपने पत्रकार परिषद घेऊन नगरच्या जागेवर दावा ठोकला आहे.

नगरची जागा भाजपला मिळावी, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार आहोत. त्यांनी २५ वर्षे केवळ द्वेषाचे व भावनेचे राजकारण केल्याचा आरोपही त्यांनी राठोड यांच्यावर केला आहे.

नगरच्या जनतेला आता बदल हवा असून, त्यासाठी जागा भाजपला मिळावी, असा ठरावही आम्ही केला आहे. शहराची जागा भाजपलाच मिळेल, अशी आशा असल्याचे गांधी यांनी सांगितले. शिवसेनेचे संभाव्य उमेदवार अनिल राठोड यांच्या उमेदवारीला गांधी यांनी विरोध दर्शवला आहे.

गांधी म्हणाले की, लोकसभेवेळी त्यांना मी नको होतो. आता आम्हालाही ते नको आहेत. मित्रपक्ष म्हणून कसे बोलायचे, वागायचे याचे तारतम्यही त्यांनी कधीच बाळगले नाही. त्यांना उमेदवारी दिली, तरीही आमचा विरोध कायम राहील, असे त्यांनी स्पष्ट केले. या वेळी महापौर बाबासाहेब वाकळे, सुवेंद्र गांधी, किशोर बोरा, जगन्नाथ निंबाळकर, श्रीकांत साठे आदी उपस्थित होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment