हातात रायफल घेऊन लग्नात !

Ahmednagarlive24
Published:

गुवाहाटी : केंद्र सरकार एकीकडे ईशान्य भारतातील नागा बंडखोरांशी ऐतिहासिक शांतता करार करण्यासाठी प्रयत्नशील आहे. अशातच नागा संघटनेचा प्रमुख किलो किलोन्सरचा पुत्र बोहोतो किबा याने आपल्या लग्नात चक्क हातात रायफल घेतल्याचा प्रकार घडला आहे.

त्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे बोहोतो किबासोबत त्याच्या नववधूनेसुद्धा हातात बंदूक घेतल्याचे समोर आले आहे. ही दृश्ये पाहून ‘नॅशनल सोशलिस्ट कौन्सिल ऑफ नागालँड-युनिफिकेशन’ (एनएससीएन-यू) मध्ये अजूनही शस्त्रांचा मोठा बोलबाला असल्याचे स्पष्ट झाले आहे.

वरील प्रकारामुळे ईशान्य भारतातून नक्षलवादी तथा बंडखोरांचे समूळ उच्चाटन करण्याच्या केंद्र सरकारच्या प्रयत्नांना हरताळ फासला गेला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment