पैशाच्या वादातून एकाला भोकसले

Published on -

देवाण – घेवाणीच्या वादातून सुनील रमेश धिवर, रा. गोंधवणी रोड, घरकुल याला बोलावून घेतले. त्याला तो म्हणाला, माझे पत्नीला नागेबाबा पतसंस्थेतून कर्ज भरण्यासाठी सारखे फोनयेत आहे.

तरी सदरचे कर्ज भरण्यासाठी तू मला आताचे आता पैसे दे, त्यावर सुनील त्यास म्हणाला, आता माझ्याकडे पैसे नाही, पैसे न दिल्याचे कारणाने दिलीपने खिशातील कात्री काढून मी आता तुझा खूनच करतो, असे म्हणून सुनीलच्या पोटावर, छातीवर कात्रीने भोकसले व शिवीगाळ केली.

याप्रकरणी सुनील धिवर याने दिलेल्याफिर्यादीवरुन दिलीप आरु विरुद्ध शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक फौजदार मुसळे करीत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe