पाथर्डी : एसटीच्या तिकीटासाठी सुटे पैसे द्या, असे सांगितल्याचा राग आल्याने तिघांनी एसटीला मोटारसायकल आडवी घालून व एसटीत चढून एसटीच्या वाहकाला शिवीगाळ, मारहाण करत दमदाटी केली. पटेलवाडा परिसरात शुक्रवारी ही घटना घडली.
वाहक संजय सुडके यांच्या फिर्यादीवरून सुरेश परसराम पवार,राहुल परसराम पवार व एका अनोळखी व्यक्तीविरुद्ध पोलिसांत गुन्हा नोंदविला आहे. पाथर्डी आगाराचे वाहक संजय सुडके हे घाटपिंप्री ते पाथर्डी ही एसटीबस घेऊन येत होते.

आल्हणवाडी येथे दोघे पवार एसटीत आले व तिकिटासाठी पाचशे रुपयांची नोट दिली. वाहकाने पैसे सुटे नसल्याचे सांगून त्यास गाडीतून खाली उतरवून दिले.
याचा राग धरून राहुल, सुरेश व आणखी एक अनोळखी इसम यांनी मोटारसायकल वरून एसटीचा पाठलाग करून पटेलवाडा फाटा येथे एसटीला मोटारसायकल आडवी घालून एसटीत चढले व वाहक संजय सुडके यांना शिवीगाळ करून मारहाण केली. याप्रकरणी वाहक सुडके यांनी तक्रार नोंदविली आहे.
- SBI कडून 30 लाखांचे होम लोन घेतल्यास किती ईएमआय भरावा लागणार ? वाचा सविस्तर
- 365 दिवसांच्या एफडीवर ‘या’ बँका देत आहेत सर्वाधिक व्याज !
- विद्यार्थ्यांनो, 16 जूनपासून सुरू होणाऱ्या नव्या शैक्षणिक वर्षात शाळांच्या वेळापत्रकात मोठा बदल ! नवीन वेळापत्रक पहा…
- SBI CBO Jobs 2025: पदवीधरांना भारतीय स्टेट बँकेत नोकरीची सुवर्णसंधी! CBO पदाच्या तब्बल 2964 जागांसाठी भरती सुरू; जाणून घ्या संपूर्ण माहिती…
- …….म्हणून महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढीबाबतचा निर्णय लांबणीवर ! राज्य कर्मचाऱ्यांचा डीए कधी वाढणार ?