अकोले :- ‘मुलं आमचंही ऐकत नाही, तुम्हीच काय करायचं ते करा’, असे उत्तर मुलींची छेडछाड करणाऱ्या टागरट मुलांच्या पाल्याने मुख्याध्यापकांना दिले. त्यामुळे टारगट मुलांच्या पालकांना समज देणाऱ्या या मुख्याध्यापकांना काय निर्णय घ्यावा, असा प्रश्न पडला आहे.
प्रवरानगर परिसरात सुरू असलेल्या या प्रकारामुळे मुलींबरोबर त्यांचे पालक व आता शिक्षकही वैतागले असल्याचे चित्र असून, यावर पोलिसांनीच काय तो मार्ग काढावा, अशी चर्चा सुरू आहे.

याबाबतची मिळालेली माहिती अशी, सध्या शाळेत जाणाऱ्या मुलींच्या छेडछाडीचे प्रकार वाढत असून, नको ती झंजट म्हणून मुली घरी सांगत नाही. परंतु, शाळेत जाताना रस्त्यावर अनेक रोडरोमियो मुलींची छेडछाड करणे, शिट्टी वाजविणे, काहीतरी मुलींना पाहून टॉन्ट मारणे असे प्रकार सध्या परिसरात पहायला मिळत आहेत.
या रोडरोमिओंचा व मुलींना त्रास देणाऱ्या टारगट मुलांचा बंदोबस्त कोण करणार, असा प्रश्न सध्या पालकांसह शाळेतील शिक्षकांना पडला आहे. शाळेतील विद्यार्थ्यांची तक्रार घेऊन जर एखादा पालक त्या मुलांच्या वडिलांकडे गेल्यास ‘मी काय करू.
तो आमचेही ऐकत नाही,’ असे उत्तर मिळते. शाळेतील शिक्षकांनी पालकांना बोलावून त्यांच्या मुलाविषयीची तक्रार केल्यास ‘सर तुम्हीच काय करायचे ते करा, तो आम्हालाही माघारी बोलतो. तो आमचे ऐकत नाही. त्यामुळे तुम्हीच काय त्याला शिक्षा करायची ती करा’, असे पालक सांगतात.
त्यामुळे शिक्षकांपुढे काय करायचे, असा प्रश्न पडत आहे. . शाळा सकाळी अकरा वाजता भरते. या वेळेत या रस्त्यावरून अनेक टारगट मुलं शाळेत पायी व सायकलवरून मुली जात असताना मोटरसायकलवरून सुसाट वेगाने त्यांच्या जवळून निघून जातात.
अशावेळी एकमेकी शेजारी चालणाऱ्या सायकलवरील मुली घसरूनही पडतात. परंतु, अशा वेळेस तेथून जाणाऱ्या मुलांना अडविणार तरी कोण असा प्रश्न सध्या या परिसरातील अनेक पालकांना भेडसावत आहे. पालक, शिक्षक, मुख्याध्यापक, विद्यार्थी-विद्यार्थिनी यांची बैठक घेऊन यावर तोडगा काढण्याची नितांत गरज आहे.
वेळीच उपाययोजना न केल्यास याचे दुष्परिणाम आपणालाच पहावयास मिळणार आहेत. अशाच काही शाळेतील मुलांची तक्रार झाल्यानंतर त्यांच्या पालकांना बोलावून शिक्षकांनी या मुलांविषयीची माहिती पालकांना दिली.
त्या मुलांकडून यापुढे असे करणार नाही असे लेखी लिहून घेतल्याची माहिती शाळेतून मिळाली. मात्र, त्यानंतरही ही टारगट मुले शिक्षकांनाही दाद देत नसल्याचे दिसते. छेडछाडीचे प्रकार करणारांना पोलिसांच्या स्वाधीन करावे का असा प्रश्न? सध्या ग्रामस्थांना पडला आहे. परंतु, नको ती झंझट, वाद म्हणून कोणीही ग्रामस्थ पुढे येत नाही.
- MBBS मध्ये प्रवेश मिळाला नाही?, मग ‘हे’ 5 मेडीकल कोर्स देतील चांगल्या पगाराची नोकरी!
- टनभर सोनं, अब्जावधींचं दान! भारतातील’या’ मंदिराची संपत्ती इतकी अफाट की एखादा देश चालू शकतो
- रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी ! भारतीय रेल्वेने लाँच केले जबरदस्त अँप्लिकेशन, नव्या एप्लीकेशनच्या विशेषता जाणून घ्या
- खूप प्रॅक्टिकल असतात ‘या’ जन्मतारखेच्या मुली, भावनांमध्ये न अडकता व्यावहारिकपणे घेतात कोणताही ठोस निर्णय!
- 1 जुलै पासून पुढील 6 महिने ‘या’ राशीच्या लोकांसाठी ठरणार गेमचेंजर ! बाबा वेंगाची नवीन भविष्यवाणी