कुऱ्हाडीने गळ्यावर वार करुन पत्नीचा घेतला जीव आणि स्वतःही केली आत्महत्या

Ahmednagarlive24
Published:

जळगाव : ‘काम करीत नाही, रिकामा राहतो, पोट कसे भरणार’ असे पत्नीने बोलल्याचा राग आल्यामुळे कुऱ्हाडीने गळ्यावर वार करुन तिचा जीव घेतला. तसेच काही वेळातच घरातून पळून जात धावत्या रेल्वेखाली झोकुन देत स्वत:ही आत्महत्या केली.

जळगावजवळील खेडी गावात बुधवारी पहाटे ही घटना घडली. बापाने केलेले हे क्राैर्य १२ वर्षीय मुलीने डाेळ्याने पाहिले. सोनी उर्फ सोनल समाधान सावळे (वय ३०) व समाधान रमेश सावळे (वय ३५) असे मृत दांपत्याचे नाव आहे.

सोनी व समाधान यांचा २००६ मध्ये विवाह झाला होता. कामधंद्याच्या निमित्ताने ते सुरतला गेले होते. नंतर वर्षभरापूर्वी खेडी येथे राहण्यास आले. समाधानने खासगी कंपनीतील नाेकरी महिनाभरापूर्वीच साेडली हाेती. मंगळवारी दुपारी ताे सूरतहून खेडीला परतला होता.

रात्री उशिरापर्यंत पत्नी सोनी, मेहुणे अर्जुन भगवान भालेराव, ज्ञानेश्वर सोनवणे (रा.कोळन्हावी, ता.यावल) यांच्यासोबत अंगणात गप्पा करीत बसला होता. तेव्हा साेनी समाधानला अपमानास्पद बाेलली, त्याचा राग त्याच्या मनात हाेता.

रात्री समाधान, सोनी त्यांची मुले अंजली (वय १२), प्रज्ञा (वय १०), राज (वय ७), मेहुणे ज्ञानेश्वर व त्यांची मुलगी नेहा हे सर्वजण झाेपले. पहाटे ४.३० वाजता समाधान याने पत्नी सोनी हिच्या गळ्यावर, हनुवटीवर कुऱ्हाडीने चार वार केले. तिचा जागीच मृत्यू झाला.

आवाजामुळे मुलगी अंजलीला जाग आली. आई रक्ताच्या थाराेळ्यात पडल्याचे तिने पाहिले. या नंतर समाधान याने घरातून पळ काढला.

दरम्यान, पाेलिसांनी समाधानचा शाेध सुरू ठेवला. सकाळी आठ वाजता त्याचा मृतदेह आसोदा येथे रेल्वेरुळावर सापडला. पत्नीचा खून केल्यानंतर समाधानने आत्महत्या केली असावी.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment