जबलपूर – मध्यप्रदेशातील जबलपूर येथील कूंडम तालुक्यातील रहिवासी असलेली महिला जेव्हा जेव्हा शेतामध्ये कामासाठी जात असत तेव्हा तिच्यावर मानक उर्फ मनु नामक व्यक्ती तेथे येऊन तिच्यावर बलात्कार करत होता.
जवळ जवळ मागील अकरा महिन्यांपासून त्रस्त असलेल्या महिलेने अखेर सोमवारी पोलीस स्टेशनला जाऊन त्याच्या विरोधात तक्रार नोंदवली. पोलिसांनी मानक उर्फ मन्नू सय्याम याच्या विरोधात तक्रार नोंदवून घेतली असून त्याला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कूंडम येथे राहणारी महिला गौरी वय – 38 आपल्या शेतामध्ये काम करायची तर तिचा पती शहरांमध्ये एका प्रायव्हेट कंपनीत काम करत असे.
गौरी 14 जानेवारी 2019 ला मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्या शेतामध्ये काम करत होती त्याच वेळी मानक उर्फ मन्नू सय्याम तिथे पोहोचला त्याने गौरीबाई सोबत अश्लील चाळे करण्यास सुरुवात केली.
जेव्हा गौरी विरोध केला तेव्हा त्याने तिला मारहाण करत तिच्यावर बलात्कार केला. या घटनेनंतर ‘तू जर कोणाला काही सांगितले तर मी तुला जीवे मारीन’ अशी धमकीही दिली.
घाबरलेल्या गौरी बाईने कुणालाही काहीही सांगितले नाही. पण जेव्हा जेव्हा ही महिला आपल्या शेतामध्ये काम करण्यासाठी जात असे तेव्हा तेव्हा मन्नू सय्याम तिथे येत असे आणि तिच्यावर बलात्कार करत असे.
जवळ-जवळ अकरा महीने मन्नू सय्याम तिचे शारीरिक शोषण करत राहिला आज जेव्हा गौरी शेतामध्ये पोहोचल्या तेव्हा मन्नू सय्याम आधीच येऊन बसला होता गौरी बाईने त्यास शारीरिक संबंध ठेवण्यास नकार देताच दोघांमध्ये खूप वादविवाद झाला.
घरी आल्यानंतर गौरीने घडलेला सर्व प्रकार आपल्या पतीस सांगितला यानंतर पोलीस स्टेशनला जाऊन त्यांनी मन्नू सय्याम विरोधात तक्रार नोंदवली. यानंतर पोलिसांनी त्वरित कारवाई करत मन्नू सय्याम याला अटक केली आहे.













