व्यापारी कुटुंबातील तिघांची आत्महत्या

Published on -

विरुधुनगर :- दक्षिण तामिळनाडूमधील पेरियावाकुलम येथे व्यापारी कुटुंबातील व्यावसायिक त्याची पत्नी व मुलाने विषारी पदार्थ खाऊन आत्महत्या केली. पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एन इनबामूर्ती (६९) त्यांचा मुलगा एन कन्नन (४०) गाेदामात मृतावस्थेत आढळून आले.

पत्नी आई थिलागावती (६१) बेशुद्धावस्थेत आढळून आले. घटनेच्या वेळी कन्ननची पत्नी व मुलगा घराबाहेर हाेते. कीटकनाशक पिऊन आत्महत्या केल्याचे सकृतदर्शनी दिसत आहे.

या कुटुंबावर खूप कर्जाचा भार हाेता त्यामुळे त्यातून हे पाऊल उचलले असावे, असा कयास आहे. हे कुटुंब कोथिंबीर विक्रीचा व्यवसाय करायचे. जवळपासच्या राज्यांत कोथिंबीर विक्री करायचे, असे आतापर्यंतच्या तपासात समोर आले आहे.

सोलक्कराय पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. एकाच कुटुंबातील तीन जणांनी आत्महत्या केल्याची घटना समजल्यानंतर पेरियावाकुलम परिसरात चांगलीच खळबळ माजली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe