अहमदनगर : दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याच्या रागातून दोघांनी मित्रालाच कमरेच्या पट्ट्याने बेदम मारहाण केली. तसेच त्याच्या हातातील अंगठी व गळ्यातील सोन्याची चेन काढून घेतली. ही घटना बोल्हेगाव येथील जॉगिंग ट्रॅक येथे घडली.
याप्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात गणेश शंकर वाकळे, आकाश गोरख कोलते (दोघेही रा. बोल्हेगाव, नगर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर या मारहाणीत योगेश राजू पवार (रा. बोल्हेगाव, नगर) हा जखमी झाला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, गणेश वाकळे याने मित्र योगेश पवार यास बोल्हेगाव येथील जॉगिंग ट्रॅकवर बोलून घेतले. यावेळी वाकळे याने दारू पिण्यासाठी पैसे मागितले. पवार यांनी १३० रुपये दिले. मात्र त्यांनी आणखी पैसे मागितले.
पवार याने आणखी पैसे देण्यास नकार दिला. त्यामुळे रागावलेल्या वाकळे व कोलते या दोघांनी पवार यास मारहाण करण्यास सुरुवात केली. कमरेचा पट्ट्याने पाठीत मारून हातातून सोन्याची अंगठी व गळ्यातील सोन्याची चेन हिसकावून घेतली
- अहिल्यानगरच्या सुपूत्राने घेतले हेलिकॉप्टर ! 2011 चे स्वप्न साकारले ; नगर शहरातील पहिलेच हेलिकॉप्टर
- दिल्लीत विद्यार्थ्यांना मोफत बस प्रवास देऊ – केजरीवाल मेट्रोत ५० टक्के सूट देण्यासाठी मोदींना लिहिले पत्र
- जमावाच्या हल्ल्यात सख्ख्या भावांचा मृत्यू पोलिसांकडून सहा संशयित ताब्यात
- मनमाड-इंदूर रेल्वेमार्गासाठी भू-सर्वेक्षणाचे आदेश ! नाशिक जिल्ह्यातील २१ गावांमध्ये सुरू होणार प्रक्रिया
- बांगलादेशने लादले १० टक्के आयात शुल्क लासलगावी लाल कांदा घसरला