लंकेत सोन्याच्या विटा आहेत त्या तुमच्या काय कामाच्या ?

Ahmednagarlive24
Published:

जामखेड : लंकेत सोन्याच्या विटा आहेत. त्या तुमच्या कामाच्या नाहीत. असा खोचक सवाल भाजपच्या प्रदेश महिला उपाध्यक्षा चित्रा वाघ चित्रा वाघ यांनी उपस्थित केला. त्या पुढे म्हणाल्या, तुम्हाला रामाचे राज्य पाहिजे. विरोधकांनी काय काम केले?

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समितीच्या माजी सभापती आशा शिंदे, सरपंच विद्या मोहळकर, महिला आघाडीच्या अध्यक्षा कविता जगदाळे, बाजार समितीच्या उपसभापती शारदा भोरे, पंचायत समितीच्या सदस्या मनीषा सुरवसे, माजी नगराध्यक्ष अर्चना राळेभात आदी उपस्थित होत्या.

कर्जत-जामखेड मतदारसंघातील भाजपचे उमेदवार राम शिंदे यांच्या प्रचारार्थ नान्नज (ता. जामखेड) येथे महिला मेळाव्याचे आयोजन केले होते. तेथे त्या बोलत होत्या. त्या पुढे म्हणाल्या, वीस वर्षे मी तिकडे होते. त्यामुळे तेथील मला माहिती आहे.

आपल्याच माणसाला सुख दु:ख कळतात. या लोकशाहीच्या मोठ्या उत्सावात विरोधकांच्या कोणत्याही भूलथापांना बळी न पडता आपल्या भावाने (राम शिंदे) पाच वर्षांत मतदारसंघात विविध विकास कामे केली. त्यांची उतराई म्हणून भावाला मदत करा, असे आवाहन त्यांनी केले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment