जेव्हा या वादविवादातून कोणताही तोडगा निघत नाही असे दिसले तेव्हा दोघे एकमेकांना आत्महत्या करण्याची धमकी देऊ लागले,
आणि दोघेही रेल्वे ट्रॅक वर जाऊन उभे राहीले. याच वेळी फिरोजपुर धनबाद एक्सप्रेस ट्रेन आली आणि तिने दोघांना जोरदार धडक दिली.
प्रत्यक्षदर्शीने सांगितले की जेव्हा रेल्वे आली तेव्हा पत्नी पतीला आणि पती-पत्नीला रेल्वे ट्रॅक वरून बाजूला ढकलण्याचा प्रयत्न करत होते, मात्र एवढ्या वेळात रेल्वे आली आणि दोघांनाही आपला जीव गमवावा लागला.
या घटनेची सूचना मिळताच जीआरपीने दोघांचेही मृतदेह ताब्यात घेतले. बॅग मधुन मिळालेल्या पासपोर्ट आणि आधार कार्ड वरून दोघांची ओळख पटवली गेलीअसून पोलिसांनी दोन्ही मृतदेह पोस्टमार्टम साठी त्यांच्या नातेवाईकांकडे सोपवले आहेत. प्रेम विवाह झाल्यानंतर पाच महिन्यांतच परिवारापासून वेगळे झाले होते.
प्रेम नगर निवासी नीरज कथुरिया आणि आझाद नगर निवासी निशा हे जवळ जवळ 16 वर्षांपूर्वी एकमेकांना भेटले तिथे दोघांमध्ये प्रेम झाले आणि दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला. नीरज व्यवसायाने फोटोग्राफर असून निशा टिक टोक वर व्हिडिओ बनवत असे.