एकनाथ खडसे म्हणतात लवकरच त्रास देणारांची नावे उघड करणार !

Published on -

शिर्डी : आपल्यावर अनेक आरोप झाले. त्यात तथ्य आढळले नाही. निर्दोष असूनही अनेकांनी त्रास दिला, तरीही आपण श्रद्धा व सबुरीचे धोरण ठेवले़. लवकरच आपण मला त्रास देणारांची नावे उघड करणार असल्याचा इशारा भाजपाचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी दिला़.

एकनाथ खडसेयांनी संपूर्ण कुटुंबासह शिर्डीत साईबाबांचे दर्शन घेतले. यानंतर माध्यामांशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.

मी साईबाबांचा श्रद्धा आणि सबुरीचा मंत्र जपतो आहे. मात्र अजून किती दिवस सबुरी ठेवायची? का संपूर्ण जीवनच सबुरी ठेवून काढायचं? की हा श्रद्धा सबुरीचा मंत्र तोडून मार्गक्रमण करायचं? याबाबतचे संकेत मला साईबाबा देतील आणि त्यानुसार माझी राजकीय वाटचाल राहील, असेही ते म्हणाले.

सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना खडसे म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विधीमंडळाचा नेता म्हणून सर्वांची मान्यता आहे. फडणवीस हे सर्वात मोठ्या पक्ष्राचे नेते आहेत. त्यामुळे देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होतील. शिवसेनेचे त्यास दुमत असू शकेल. त्यांची मागणी कोणत्या आधारावर हे शिवसेनाच सांगू शकेल. असेही ते म्हणाले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe