धक्कादायक:- महिला तहसीलदारास जिवंत जाळले!

Published on -

हैदराबाद: तेलंगणात सोमवारी दुपारी विजया रेड्डी या तहसीलदार महिलेला एका व्यक्तीने अंगावर पेट्रोल टाकून जिवंत जाळले. यात विजया यांचा जागेवरच मृत्यू झाला. रंगारेड्डी जिल्ह्यातील अब्दुल्लापूरमेट येथे ही घटना घडली.

एका अधिकाऱ्याने सांगितले की, तहसीलदारांना वाचवण्याच्या प्रयत्नात दोन कर्मचारी जखमी झाले आहेत. कोर्टाच्या आदेशानंतरही जमिनीच्या कागदपत्रात योग्य त्या दुरुस्ती न केल्यावरून नाराज असलेल्या सुरेश मुदिराजू याने हे कृत्य केले.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दुपारी जेवणाच्या वेळी दीड वाजता सुरेश जमिनीची कागदपत्रे घेऊन कार्यालयात आला. तो तहसीलदार विजया यांच्या दालनात गेला. तेथे अर्धा तास झालेल्या वादानंतर त्याने विजया यांच्या अंगावर पेट्रोल टाकून आग लावली.

त्या वेळी विजया दालनात एकट्या होत्या. एका प्रत्यक्षदर्शीने आरडाओरड केल्यानंतर बाकीचे लोक दालनात गेले. रचकोंडाचे पोलिस आयुक्त महेश भागवत यांनी सांगितले की, हल्लेखोरालाही आगीची झळ बसली आहे. तो ५० ते ६० टक्के भाजला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe