असे म्हटले जाते की प्रेमासाठी कोणतीही सीमा नसते आणि असेच काहीसे घडले कराची येथील एका मुलीसोबत, तिला मुंबईमधील एका मुलासोबत प्रेम झाले. सोशल मीडियावर सारा हुसेन ची ही सुंदर लव स्टोरी खूपच व्हायरल झाली.
ह्यूमन ऑफ बॉम्बे ने आपल्या फेसबुक पेजवर त्यांची सुंदर लव स्टोरी शेअर केली आहे. त्यांनी सांगितले की कशाप्रकारे कराचीची मुलगी मुंबईतील एका मुलाच्या प्रेमात पडली आणि ती भारतात आली.
या पोस्टमध्ये सारानी सांगितले की कशाप्रकारे तिने आपला मित्र दाउद सोबत लग्न केले आणि ती मुंबईला येऊन राहू लागली. परंतु लग्नानंतर त्यांच्या अडचणीत खूपच वाढ झाली भारतात आल्यानंतर अनेक तास त्यांना कस्टम आणि सेक्युरिटी चेकिंग मध्ये घालावे लागले. लग्नानंतर दोनच महिन्यात दाऊदचा जॉब गेला.
त्यानंतर दोघांनी जॉब शोधण्याचा खूप प्रयत्न केला मात्र त्यांना जॉब देण्यास कोणीही तयार नव्हते. या कठीण प्रसंगी सारा खूप डिप्रेशनमध्ये गेली होती, मात्र तरीही तिने हिम्मत करून दाऊदला पूर्ण साथ देण्याचा निर्धार केला. पाकिस्तान मध्ये ती मेकअप आर्टिस्टचे काम करत असे. तिने निर्णय घेतला की इथेही ती तेच काम करणार.
या बिजनेस मध्ये दाऊदने साराला खूप मदत केली. त्यानंतर दोघांनाही चांगले कस्टमर मिळू लागले. आत्ता सारा मेकअप आर्टिस्ट चे काम करते आणि दाऊद तिला या बिझनेस मध्ये मदत करतो. सोशल मीडियावर यांची ही स्टोरी व्हायरल झाल्यानंतर त्यांना सात हजार पेक्षा जास्त रिॲक्शन भेटले आहेत आणि तीनशेपेक्षा जास्त लोकांनी त्यांची स्टोरी शेअर केली आहे.