बलिया : काँग्रेसची विचारधारा ही देशाला कमकुवत करणारी व पाकधार्जिणी असून, पाकिस्तानी लोक प्रियंका व राहुल गांधी यांना आपले रोल मॉडल मानतात, अशी टीका उत्तर प्रदेशचे ग्रामविकास राज्यमंत्री आनंद स्वरूप शुक्ला यांनी केली आहे.
बलिया जिल्ह्यातील राजा गाव खरौनीमध्ये रविवारी आयोजित एका कार्यक्रमात इतर पत्रकारांशी बोलताना भाजप मंत्री शुक्ला यांनी काँग्रेसवर हल्ला चढविला.
काँग्रेस तुकडे-तुकडे गँगसोबत उभी असते. त्यांची विचारधारा देशाला कमकुवत करणारी आहे.
काँगे्रसकडून सातत्याने काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम रद्द केल्याचा विरोध केला जात आहे.
पाकिस्तान लोक प्रियंका व राहुल गांधी यांना आपले रोल मॉडल मानतात. पाकमध्ये त्यांचे पोस्टर लावले जातात, असा दावा शुक्ला यांनी यावेळी केला.