अल्पवयीन मुलीवर तिच्याच वडिलांनी बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस !

Ahmednagarlive24
Published:

दिल्ली: वडिलांनीच आपल्या अल्पवयीन मुलीवर वारंवार बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडित मुलीनेच तिच्यासोबत घडलेला प्रकार सांगितला आहे.

पीडित मुलीने सांगितले की, अवघ्या सहा वर्षांची असतानाच वडिलांनी तिच्यावर बलात्कार केला. जवळपास आठ वर्षे हा प्रकार सुरु होता. ही धक्कादायक घटना यूकेमधील डर्बी येथील आहे. पीडित मुलगी १३ वर्षांची असताना तिने बाळाला जन्म दिला. 

पीडित तरुणीने आपलं एक पुस्तक लिहिलं आहे. ‘the monster I love’ या पुस्तकात पीडित मुलीने आपल्यासोबत घडलेला प्रकाराचा उल्लेख केला आहे.

तिने सांगितले की, पाच वर्षांचीच असताना आई-वडील एकमेकांपासून वेगळे झाले. मी वडिलांसोबत राहू लागली. सुरुवातीला ते खूपच चांगले होते मात्र, नंतर ते हिंसक होऊ लागले, मला मारहाण करु लागले तसेच शारीरिक शोषणही करण्यास सुरुवात केली. 

पीडित मुलीने सांगितले की, ९ वर्षांची असताना मला सेक्स या शब्दाचा अर्थ कळाला. जेव्हा मला शिक्षिकेने गुड टच आणि बॅड टच संदर्भात सांगितले तेव्हा मला धक्काच बसला.

२०१२ मध्ये पीडित मुलगी पुन्हा गरोदर झाली. यावेळी तिने शिक्षिकेला सांगितले. त्यानंतर सुट्टीत वडिलांनी मला प्रचंड मारहाण केली आणि शारीरिक शोषण करत असे. त्यावेळी दुसऱ्यांचा माझा गर्भपात झाला आणि मग २०१३ मध्ये तिसऱ्यांदा गरोदर झाली.

यानंतर माझ्यावर पुन्हा पायऱ्यांवरच बलात्कार केला. मग आत्महत्या करण्याचा माझ्या मनात विचार आला होता. त्याने मला गर्भपात करण्यास जबरदस्ती केली होती. पण मी आपल्या शिक्षिकेच्या मदतीने रुग्णालयात बाळाला जन्म दिला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment