जामखेड :- तीन वेगवेगळ्या घटनांत बालिका, शेतकऱ्यासह तीन जणांचा मृत्यू झाला. यामध्ये एका अनोळखी व्यक्तीचा समावेश आहे.
पहिली घटना भुतवडा येथे घडली. शनिवार आदिती हनुमंत मोरे (१२ वर्षे) ही मुलगी आईबरोबर शेतात गेली होती. दुपारी दोनच्या सुमारास आईने तिला शेजारी असलेल्या भुतवडा तलावात पाणी आणण्यासाठी पाठवले. ती आपल्या लहान भावंडांना घेऊन पाणी आणण्यासाठी गेली.

आदिती तलावात पाणी काढण्यासाठी उतरली असता तोल जाऊन पाण्यात पडून बुडायला लागली. काठावर उभ्या असलेल्या भावंडांनी आरडाओरडा केल्यावर आजूबाजूचे लोक धावत आले. त्यांनी आदितीला तलावातून बाहेर काढले, मात्र तिचा मृत्यू झाला.
दुसरी घटना शेतकरी बाबासाहेब भिमराव डोके (४५ वर्षे) यांनी घरात कोणी नसताना समोर असलेल्या सिमेंटच्या कॉलमला नायलॉनच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली.
तिसऱ्या घटनेत शनिवारी रात्री शहरातील बसस्थानकात घडली. पुणे – बीड (एमएच ०६, बीडब्ल्यू ०९४०) या शिवशाही बसचा चालक गाडी पाठीमागे घेत असताना मागील चाकाखाली एका अनोळखी व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला.
- अहिल्यानगर : जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील अडचणीत, सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर पोलिसात गुन्हा दाखल !
- रेल्वे प्रवाशांसाठी कामाची बातमी ! तिकीट हरवल्यास काय कराल ? वाचा डिटेल्स
- अब्जावधी रुपये खर्चुनही ग्रामीण भागात टँकरने पाणीपुरवठा
- Ahilyanagar News : सह्याद्रीच्या कुशीतल्या देवरायांना मिळणार संरक्षण, वन विभागाचा ऐतिहासिक निर्णय
- Ahilyanagar Politics : अखेर सभापती राम शिंदे यांनी बाजी मारली ! रोहित पवारांचे वाईट दिवस सुरु…