झारखंड- झारखंड राज्यातील कोडरमा जिल्ह्यात मनाला हादरा बसवणारी एक धक्कादायक घटना घडली आहे. येथील एका इसमाने आपल्या गर्भवती पत्नीसमवेत 3 तीन लहान मुलांची हत्या केली आहे.
या भयानक घटनेत एक सात वर्षीय भाची गंभीररीत्या जखमी झाली आहे मृतांमध्ये पत्नी, आई आणि तीन मुलांचा समावेश आहे.सूत्रांच्या माहितीनुसार ही घटना मंगळवारी रात्री उशीरा घडली. सध्या पोलिसांनी आरोपी गंगादास याला अटक केली आहे.
मंगळवारी रात्री अडीच वाजण्याच्या दरम्यान गंगादास ने घरातील चाकू घेऊन सर्वप्रथम आपल्या गर्भवती पत्नीवर आणि नंतर मधी बचावासाठी आलेल्या आई शांतीदेवी वर हल्ला करत त्यांची हत्या केली.
त्यानंतर आपल्या तीन वर्षीय मुलाला आणि नंतर चार वर्षीय मुलीला त्याने गळा चिरून मारले. यानंतर आपल्या दोन भाच्या गीतिका आणि नितिका यांच्यावर त्याने वार केले यामध्ये नितिका चा जागीच मृत्यू झाला तर गितीकाला ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले.
गितीकाला पुढील उपचारासाठी रांची येथे हलविण्यात आले आहे. या घटनेला मूर्तरूप दिल्यानंतर गंगादास ने स्वतःला एका खोलीमध्ये बंद करून घेतले. पोलिसांना सूचना मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून प्रारंभिक तपास सुरू केला आहे. यादरम्यान आरोपीने सांगितले की त्याला आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय असल्याने त्याने तिचा खून केला.