कर्जत: तालुक्यातील गावे बूथ कमिटीव्दारे ज़ोडण्यात येतील, अशी माहिती आ. रोहित पवार यांनी दिली. कर्जत तालुक्यात गावनिहाय बूथ कगिटची स्थापना करण्याच्या उद्देशाने काँग्रेस -राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत आ. पवार बोलत होते.
तालुक्याच्या विकासाचा आराखडा मांडताना, आगामी काळात जनतेच्या हिताचीच कामे होतील. विकासकामांत राजकारण करणार नाही, कर्जत तालुक्यातील प्रत्येक गावाचे प्रश्न सोडविण्यासाठी गावागावांत बूथ कमिटीची स्थापना करणार आहोत, यामध्ये राष्ट्रवादी व काँग्रेस, अशा दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते असतील.
राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष काकासाहेब तापकीर यांनी स्वागत केले. या वेळी बबनभाऊ नेवसे, रघुआबा काळदाते, अशोकराव जायभाय, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष किरण पाटील व मा. जि. प. सदस्य प्रवीण घुले यांचीही भाषणे झाली.
जि. प. सदस्य गुलाबराव तनपुरे, राजेंद्र गुंड, ॲड. हर्ष शेवाळे, सुनील शेलार, विजय नाना मोढळे, शाम कानगुडे, दिलीप जाधव, सचिन सोनमाळी, ऋषिकेश धांडे आदींसह पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.
आ. पवार यांनी तालुक्याच्या सर्व प्रश्नांचा उहापोह करत हे प्रश्न पाठपुरावा करून सोडविणार असल्याचे सांगत मतदारसंघाचा बारामतीच्या धर्तीवर विकास करून एक वेगळे मॉडेल तयार करण्याचा आपला मानस आहे. मतदारसंघातील रस्त्यांच्या कामाबाबत अधिकाऱ्यांशी बोलणे झाले असून, कुकडी व सीना धरणाच्या पाण्याचा मार्गी लावला ज़ाईल.
तुकाई चारीद्वारे पाणी आणण्याच्या दृष्टीने सव्र्हे करण्याचे काम सुरू आहे. कर्जत शहरात कार्यालय सुरू करणार असून, वीस हजार लोकांमागे एक कार्यालय असणार आहे.
सिंगल फेजच्या कामाबाबत चर्चा झाली असून, मिरजगाव येथील मुख्य रस्त्यावरील खड्डे पंधरा दिवसांत बुजविले जातील. शेततळे, कांदाचाळी व ठिबकचे अनुदान लवकरच मिळणार असून, याबाबत आयुक्तांशी आपण बोललो आहोत, असे आ. पवार म्हणाले.