दोन तरुणांच्या त्रासाला कंटाळून विद्यार्थिनीची विष प्राशन करून आत्महत्या

Published on -
नगर –  कॉलेज तरुणीने दोन तरुणाच्या रोजच्या त्रासाला कंटाळून विषारी औषध घेऊन आत्महत्या केली. हा धक्कादायक प्रकार नगर जिल्ह्यातील कर्जत भागात जुने कोर्ट परिसरात घडला. 
सविस्तर माहिती अशी की,  नगर जिल्ह्यातील कर्जत भागात जुने कोर्ट परिसरात वैष्णवी राजेंद्र पवार, वय १८ वर्ष, रा. जळकेवाडी, ता. कर्जत हिला दोघा आरोपींनी कॉलेजला येता – जाता नेहमी त्रास दिला.
फोन करून अश्लील बोलून त्रास दिला. या त्रासास कंटाळून कु. वैष्णावी पवार या विद्यार्थिनीने विषारी औषध पिले. तिला उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना विद्यार्थिनी कु. वैष्णवी पवार हिचा मृत्यू झाला.
काल याप्रकरणी मयत वैष्णवी पवारचे वडील राजेंद्र बापू पवार, रा. जळकेवाडी कर्जत यांनी कर्जत पोलिसांत फिर्याद दिल्यावरुन आरोपी सुहास प्रदीप वाघमारे व सुहास याचा चुलत भाऊ नाव माहीत नाही दोघे रा. जायकवाडी कर्जत या दोघांविरुद्ध दाखल करण्यात आला आहे.
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe