केजरीवाल शेतकऱ्यांना देणार १०० कोटींची भेट!

Ahmednagarlive24
Published:

दिल्लीत आगामी फेब्रुवारी महिन्यात विधानसभा निवडणुका होत आहेत. या अनुषंगाने आम आदमी पक्ष मतदारांना आकर्षित करण्याची कोणतीही संधी सोडत नाही. मोफत मेट्रो, मोफत वीजनंतर आता केजरीवाल सरकार ‘मुख्यमंत्री किसान मित्र योजना’ लागू करण्यावर विचार करत आहे.

‘मुख्यमंत्री किसान मित्र योजना’ लागू करण्यासंदर्भात एक कॅबिनेट नोट तयार केली जात असून लवकरच ती सरकारकडे पाठवली जाणार आहे. या योजनेच्या अंतर्गत अरविंद केजरीवाल यांचे सरकार शेतकऱ्यांची विशेष काळजी घेत त्यांच्या पिकांच्या किमतीपेक्षा ५० टक्के अधिक देण्याची तयारी करत आहे.

ही योजना लागू झाल्यानंतर दिल्लीतील शेतकऱ्यांच्या गव्हाची किंमत प्रति क्विटंल २५०० रुपयांपेक्षा जास्त होणार आहे. . या योजनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीतील आम आदमी पक्ष (आप)चे सरकार या महिन्याच्या अखेरीस ही योजना लागू करण्याच्या विचाराधीन आहे.

याबाबतच्या आकडेवारीनुसार, दिल्लीत जवळपास २० हजार शेतकरी कुटंब राहतात. या योजनेतून अनेक कुुटंबांना फायदा होणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment