कोपरगाव : बहिणीकडे पाहून शिट्टी वाजवली, याचा जाब विचारण्यास गेलेल्या तरुणास पाच जणांनी पहार व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
ही घटना ६ ला संजयनगरमध्ये घडली. पोलिसांनी पाच जणांवर गुन्हा दाखल केला.
या संदर्भात राहुल सोमनाथ गायकवाड (२० वर्षे) यांनी फिर्याद दिली. बहिणीकडे पाहून शिट्टी वाजवली, याचा जाब फिर्यादीने विचारला असता अमोल संपत रोठे, सोमनाथ संपत रोठे, मंगेश संपत रोठे, संपत रामा रोठे व लताबाई संपत रोठे यांनी त्यास मारहाण केली. फिर्यादी गंभीर जखमी झाला आहे.