पिसाळलेला व्यक्ती आल्याची खोटी माहीती शोशल मिडीयावर टाकणार्यांवर कारवाई करा

Ahmednagarlive24
Published:
लोणी : सोशल मिडीयावर लोणी बुद्रुक परिसरात पिसाळलेला माणुस दिसला असुन त्याने काही नागरीकांना चावा घेवून जखमी केले असल्याचा खोटा मजकुर प्रसारित केलेल्या वृत्ताची ग्रामपंचायत प्रशासनाने गंभीर दखल घेतली असुन  खोटा मजकुर प्रसारित केरणार्यांवर  कारवाई करणार असल्याचे ग्रामपंचायतीने प्रसिद्धी पत्रक काढुन स्पष्ट केले आहे.
मागील काही दिवसांपूर्वी नगर शहर आणि परिसरात पिसाळलेल्या माणसाने मोठी दहशत निर्माण केली होती. नगर येथील एका व्यक्तीला त्याने चावा घेवुन जखमीही केले होते.
त्यामुळे नागरीकांमध्येही मोठ्या प्रमाणात भितीचे वातावरण निर्माण झाले होते. त्या पिसाळलेल्या व्यक्तीमुळे पोलिस प्रशासनासह थक्क झाले होते.
आता हा व्यक्ती लोणी बुद्रुक येथे आला असुन गावातील बस स्थानक परिसरात त्याला वावरताना पाहीले असुन त्याने काही व्यक्तींना चावाही घेतला आहे असा खोटा मेसेज गावातील सोशल मिडीयातून मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्यामुळे गावातील व परिसरातील नागरीकांमध्ये व पालकांमध्ये घबराहटीचे वातावरण निर्माण झाले आहे.
यावृत्ताची माहीती ग्रामपंचायत प्रशासनाला मिळताच ग्रामपंचायतीने याची लगेच गंभिर दखल घेत प्रसिद्धी पत्रकाव्दारे असा माणुस गावात व परिसरात दिसला नाही व आलेला नाही. त्यामुळे ग्रामस्थांनी व पालकांनी घाबरुण जाण्याचे कारण नाही.
असे स्पष्ट करतानाच अशी खोटी बातमी समाज माध्यमातून प्रसिद्ध करणार्यांवर कठोर कारवाई करणार असल्याचे प्रसिद्धी पत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment