भरदुपारी एसटी स्टॅण्डवर ५ तोळ्याचे सोन्याचे मंगळसूत्र ओरबाडले !

Published on -
नगर –  नगर शहरात लुटमार करणार्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असतानाच शहरातील  माळीवाडा परिसरात एसटी स्टॅण्ड येथे दुपारी ४.३० च्या सुमारास महिलेचे गळ्यातील ५ तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र चोरांनी ओरबाडून धूम ठोकली. 
सौ. उषा चंद्रकांत केदार असे या सेवानिवृत्त महिलचे नाव  असून (रा. पाईपलाईन रोड, वैष्णवी कॉलनी, नगर) येथे राहत आहेत.
 सोन्याच्या मंगळसूत्राची किंमत १. २५ लाख असून घटनास्थळी पोनि वाघ यांनी भेट दिली. उषा केदार या महिलेच्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्याविरुद्ध कोतवाली पोलिसात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe