अहमदनगर ब्रेकिंग – महिलेचा खून करून मृतदेह खड्ड्यात फेकला !

Ahmednagarlive24
Published:

नेवासा-  एका ३० ते ४० वर्ष वयाच्या महिलेचा खून करून मृतदेह खड्ड्यात फेकल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

ही घटना नेवासा खुर्द परिसरात असलेल्या जळके गावच्या शिवारात राजू जानकू सोनकांबळे यांच्या शेती गट नं.१२९ /१ मध्ये असलेल्या कॅनॉललगत मृतदेह फेकून देण्यात आला. या महिलेच्या तोंडावर जखमा असून गळा दाबून मारहाण करुन सदर महिलेचा खून करण्यात आला असावा, असे प्रथमदर्शनी समोर आले आहे.

घटनास्थळी अप्पर पोलीस अधिक्षक सागर पाटील, डिवायएसपी मंदार जावळे, पोनि डेरे यांनी भेट दिली. याप्रकरणी नेवासा पोलीस स्टेशने हे.कॉ कैलास साळवे यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात आरोपीविरुद्ध भादवि कलम ३०२ प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान नेवासा पोलिसांनी सदर महिलेची ओळख पटविली असून सदर महिला ही गंगापूर तालुक्यातील बोलठाण येथील असून तिचे नाव मंगला सोमीनाथ दुशिंग, वय ३५ असे असल्याचे पुढे आले आहे.

बारकाईने तपास करून नेवासा पोलिसांनी दोन संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले असून संशयितांची कसून चौकशी सुरू होती. दरम्यान महिलेच्या गळ्यात सोन्याचे मंगळसूत्र व कानात सोन्याचे दागिने आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment