शेतात कांदा सडलेच्या विवंचनेतून शेतकऱ्याची आत्महत्या

Published on -

नेवासा – तालुक्यातील नजीक चिंचोली येथील शेतकरी अनिल नारायण शेळके, वय – ४२ यांनी राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली. मंगळवार दि . ५ रोजी सायंकाळी ही घटना घडली.

दरम्यान, कर्जबाजारीपणा आणि पावसाने शेतातच कांदा सडून गेल्याच्या विवंचनेतून शेळके यांनी आत्महत्या केल्याची माहिती नातेवाईकांनी दिली. अनिल यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, मुलगा असा परिवार आहे. 

नेवासा फाटा येथील ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीवरून नेवासा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 

अनिल नारायण शेळके यांनी मंगळवारी सायंकाळी गळफास घेतल्याची माहिती मिळताच त्यांचे नातेवाईक बाबासाहेब धोंडीराम सोनपूर यांनी त्यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. पुढील तपास पोलीस नाईक काळे हे करीत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe