जामखेड : तालुक्यातील पाटोदा गरडाचे येथे मळणी यंत्राव्दारे उडिदाची मळणी करत असताना,मळणी यंत्रात गेल्याने मंगल अशोक भाकरे (वय ४५) या महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
याबाबत सविस्तर असे की, जामखेड तालुक्यातील पाटोदा गरडाचे येथील हभप भाकरे महाराज यांच्या पत्नी मंगल अशोक भाकरे यांचा उडदाची मळणी करत असताना मळणी यंत्रात डोके गेल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

त्यांच्या पश्चात एक मुलगा, तीन मुली असा परिवार आहे. या घटनेची माहिती समजताच सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी रुग्णवाहिका घेऊन घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेह जामखेडच्या ग्रामीण रुग्णालयात आनला.
येथे डॉ.युवराज खराडे यांनी शवविच्छेदन केले. या वेळी संदेश कोठारी, दत्ता वराट, खंडु कवादे यांनी मदत केली. याबाबत जामखेड पोलिस स्टेशनला आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
- महाराष्ट्राला मिळणार आणखी एक नवीन रेल्वे मार्ग ! ‘ही’ शहरे एकमेकांना जोडली जाणार, कसा असणार रूट ?
- कोणत्या राज्यात पहिल्यांदा आठवा वेतन आयोग लागू होणार ? महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांना कधी मिळणार 8th Pay Commission
- स्वतःचा बिजनेस सुरु करायचाय ? मग दीड लाखाच्या गुंतवणूकीत ‘हा’ बिजनेस सुरु करा, दरमहा मिळणार 60 हजारापर्यंतचा नफा
- जमीन खरेदी विक्रीच्या नियमांत मोठा बदल, ‘हे’ 4 नवीन नियम तुम्हाला माहिती असायलाच हवेत !
- IDBI Bank Bharti 2025: IDBI बँक अंतर्गत 650 रिक्त जागांसाठी भरती सुरू; त्वरित अर्ज करा