पारनेर: नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार असलो पारनेर व नगर तालुक्यातील बाळासाहेबांची शिवसेना, काँग्रेस, भाजपासह सर्वच पक्षांतील कार्यकर्ते पक्षनिष्ठा सोडून एक व्यक्ती म्हणून माझ्या पाठीशी ठाम राहिल्याने मोठया मताधिक्याने माझा विज़य झाला, असे आमदार नीलेश लंके यांनी सांगितले.
रविवारी टाकळी ढोकेश्वर येथे झालेल्या नागरी सत्काराच्या कार्यक्रमात आ. लंके बोलत होते. निवडणुकीच्या काळात अनेकांनी मला अडणीत आणण्यासाठी पैशाचा दुरुपयोग केला. कार्यकर्त्यांवर दबाव टाकत दहशत निर्माण केली; परंतू त्यांना हे समजले नव्हतं की, तुमच्याबरोबर उघड फिरणारे आतून माझे काम करत होते.
यापुढील काळात शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्याचा व पारनेर तालुक्यात शाश्वत पाणी आणण्यासाठी मी बांधील आहे, असेही लंके यांनी सांगितले.
या वेळी नीलेश लंके प्रतिष्ठानचे प्रांताध्यक्ष सुदाम पवार, राष्ट्रवादीचे नेते संजय भोर, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संभाजी रोहकले सर, ज्येष्ठनेते राजेंद्र चौधरी, प्रतिष्ठानचे अध्यक्ष बापू शिर्के, युवा अध्यक्ष विजय औटी, डॉ. बांडे, डॉ. खिलारी, लाकूडझोडे सर, दत्ता आवारी, कारभारी पोटघन, काँग्रेसचे युवा अध्यक्ष योगेश शिंदे, सुनील चव्हाण सर, बबलूशेठ रोहकले, ज्ञानेश्वर चौधरी,
बाळासाहेब खिलारी गुरुजी, भाऊ झावरे, रावसाहेब झावरे, गणपत भाळनर, अंकुश पायमोडे, विक्रम झावरे, विलास ठूबे, विलास धुमाळ, संभाजी वाळुंज, बबन बांडे, संजय खिलारी, शंकर रोहकले, जितेश सरडे, अनिरुद्ध लाकूडझोडे, शंकर रोहकले, श्रीकांत चौरे, सिध्देश खिलारी, भागाजी झावरे,
राजेंद्र झावरे, भाऊ पावडे, भिकाजी धुमाळ, दादा भालेकर, चांद शेख, दत्ता निवडुंगे, महेश झावरे, दादा झावरे, दामोदर झावरे, नारायण झावरे, चंद्रकांत नवलेंसह राष्ट्रवादी काँग्रेस, सर्व मित्र पक्ष, नीलेश लंके प्रतिष्ठानचे अनेक पदाधिकारी,कार्यकर्ते पत्रकार व ग्रामस्थ उपस्थित होते.