ना. विजय औटी यांच्यासह पदाधिकार्यांच्या शेतीचे जास्त नुकसान झाले नसावे ‘त्या’ वादावर खा.विखे यांचा चिमटा !

Ahmednagarlive24
Published:

पारनेर- ना. विजय औटी यांच्यासह पदाधिकारी यांना बुधवारी माझ्या तालुका दौऱ्यासंदर्भात निरोप दिले असताना ते या दौऱ्यात का सहभागी झाले नाही ते कळाले नाही. यामुळे एकतर त्यांच्या शेतीचे जास्त नुकसान झाले नसावे किंवा त्यांचे पंचनामे राहिले असावेत, असा चिमटा खा. डॉ. सुजय विखे यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.

तर दुसरीकडे सध्या राजकीय परिस्थिती पाहता यावर मी सरकार स्थापनेनंतर अधिक बोलेल, असेही खा. डॉ. सुजय विखे यांनी सुचक व्यक्तव्य केले.

खा. डॉ. विखे म्हणाले की, अवकाळी व अवेळी आलेल्या पावसाने मोठे नुकसान झाले आहे. त्यावर प्रशासन चांगले काम करत आहे. या नुकसानीची पहाणी करण्यासाठी तालुक्यात आलो आहे. मात्र या दौऱ्याच्या दिवशी सोशल मीडियावर ‘या दौऱ्यावर बहिष्कार, असे आवाहन शिवसेनेने केले होते.

त्यावर मिश्किल टिपण्णी करत खा. विखे म्हणाले, त्यांच्या शेतीचे पंचनामे करायचे असेल त्यामुळे ते आले नाहीत. त्यामुळे पक्षाचे अधिकृत पत्र असल्याशिवाय बहिष्कार ग्राह्य समजू नये. तालुकाध्यक्ष रोहकले यांचे पत्र यांनी काढले नाही.

तर युतीचा धर्म पाळत अनपेक्षित निकाल लागला असून नाराजीच्या आमच्याकडुन काही गोष्टी घडल्या आहेत. त्याचे आत्मचिंतन करणार आहे. तर दुसरीकडे पारनेर पंचायत समितीमध्ये भाजपाचा एकही सदस्य नसल्याने आम्ही सभापतीपदासाठी कोणत्याही प्रकारचा प्रयत्न करणार नाही. काँग्रेस – राष्ट्रवादीची सत्ता पंचायत समितीमध्ये आहे.

महायुतीचे उमेदवार म्हणुन यापुढील काळात काम करणार आहे. पारनेर तालुक्यातील राजकीय घडामोडीबाबत आपण सरकार स्थापनेनंतर बोलू. कारण सध्याची राजकिय परिस्थितीत बोलणे उचित होणार नाही. यासाठी स्वतंत्र पत्रकार परिषद घेईल, असे ही खा. सुजय विखे यांनी सांगितले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment