जंक फूडच्या अतिसेवनामुळे हिरावली त्याची दृष्टी

Ahmednagarlive24
Published:

लंडन : ब्रिटनमधील १७ वर्षाच्या मुलाची दृष्टी हिरावली गेली असून त्याला ऐकायलाही कमी येऊ लागले आहे. याचे कारण अतिशय विचार करायला लावणारे आहे. गेल्या दहा वर्षांपासून त्याने चिप्स, बर्गर, फ्रेंच फ्राइज याव्यतिरिक्त काहीच खाल्लेले नाही.

म्हणजे गेले दशकभर तो फक्त जंक फूडवर जगत राहिला. माध्यमिक शाळेत प्रवेश घेतल्यापासून हेच त्याचे अन्न झाले. ब्रिस्टलमधील मुलांच्या रुग्णलयातील डॉक्टरांनी सांगितले की, ब्रिटनमधील अशाप्रकारची ही ही पहिलीच घटना आहे.

सध्या या मुलावर नेत्र रुग्णालयात उपचार सुरु आहेत. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, या मुलाने फक्त जंक फूडचेच सेवन केले. फळे व भाज्यांना कधीच तोंड लावले नाही. त्याला अनेक फळे व भाज्यांचे रंग व चव पसंत नाहीत. त्यामुळे चिप्स व प्रिंगल्स हेच त्याचे अन्न झाले होते.

परिणामी त्याला अवॉइडेंट- रि्ट्रिरक्टिव्ह फूड इंटेक डिसऑर्डर झाले आहे. प्रक्रिया केलेल्या खाद्यपदार्थांमध्ये साखर व कार्बोहायड्रेटचे प्रमाण जास्त असल्याने श्रवण क्षमतेवर परिणाम झाला आहे. हाडेही ढिसूळ झाली आहेत.

या मुलाचे वजन योग्य आहे. त्याची उंची आणि बीएमआयसुद्धा सामान्य आहे. मात्र इटिंग डिसऑर्डरमुळे त्याची ही दशा झाली आहे. त्याच्या वयाच्या मुलांमध्ये ती दिसत नाही. त्याला जीवनसत्व देण्यात आले.

मानसिक आरोग्य पथकाच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले. पण तरीही काहीच फायदा झाला नाही. त्याच्या डोळ्यांमध्ये ब्लाइंड स्पॉट झाले असून ऑप्टिक नर्व फायबर नष्ट झाले आहेत. यामुळे त्याची दृष्टी परत येणे शक्य नाही.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment