कर्जत : सत्ताधाऱ्यांकडुन जाहीरनाम्यात दिलेल्या आश्वासनांची पूर्तता झाली नाही. परिसरातील रस्त्यांची खुपच दयनीय अवस्था आहे. अंबालिकाने नगर जिल्ह्यात उसाला सर्वाधिक बाजार भाव दिल्क.कर्ज फिटले तर आणखी जास्त भाव देणार.
मुखमंत्र्यांच्या बगलबच्यांनी त्यांच्याकडील कारखान्यांची काय अवस्था करून टाकली आहे. मात्र स्वत:चे ठेवायचे झाकून अन् दुसऱ्याचे बघायचे वाकून हे मुख्यमंत्र्यांना शोभत नाही. पालकमंत्र्यांचा स्टाईल करण्यात वेळ जातो मग विकास कधी करणार?असा हल्लाबोल माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला. .
कर्जत जामखेड विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादीचे उमेदवार रोहित पवार यांचे प्रचारार्थ राशीन येथील सभेत ते बोलत होते. कर्जत-जामखेडकरांच्या विश्वासाला रोहित तडा जाऊ देणार नाही. कुणाचीही शरमेने मान खाली जाईल असं कोणतंही काम करणार नाही अशी मी हमी देतो असे म्हणत त्यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीकास्त्र सोडले. .