आदिवासी समाजातील महिलेवर घर बांधून देण्याचे आमिष दाखवून अत्याचार

Ahmednagarlive24
Published:

कोपरगाव : तालुक्यातील शहापूर येथील गरीब आदिवासी समाजातील महिलेवर घर बांधून देण्याचे आमिष दाखवून अत्याचार करण्यात आल्याची घटना घडली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की ही महिला पतीपासुन दोन लहान मुलांसह विभक्त राहाते.

संगमनेर तालुक्यातील मंगळापूर येथील दत्तात्रय बादशहा वाळे (वय ५२) याने तीला ‘तुला एक गुंठा जागा देऊन घर बांधून देतो, तुझ्या लहान मुलांचा सांभाळ करतो’, असे आमिष दाखवून तीच्यावर वेळोवेळी ठिकठिकाणी अत्याचार केला.

विरोध केला असता मारहाणदेखील केली. तीच्या फिर्यादीवरून वाळे याच्याविरुद्ध अत्याचाराचा तसेच अनुसुचित जाती- जमाती अन्याय अत्याचार प्रतिबंधक कायदद्याच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकाराचे गांभीर्य लक्षात आल्यावर शिर्डी पोलिसांनी तात्काळ कारवाई सुरू केली. पोलिसांनी ज्या हॉटेलमध्ये अत्याचार झाला, तेथे जाऊन पाहाणी करून हॉटेलचे रजिस्टर ताब्यात घेतले.

महिलेस अन्याय अत्याचार भ्रष्टाचार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल गांगुर्डे यांनी धीर दिला. त्यांनी हा प्रकार पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांना सागताच तात्काळ गुन्हा दाखल करण्यात आला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment