आणि महिलेने झोपेत गिळली हिऱ्यांची अंगठी !

Ahmednagarlive24
Published:

कॅलिफोर्निया : अमेरिकेच्या कॅलिफोर्नियामध्ये एक चक्रावणारे प्रकरण समोर आले आहे. तिथे एका महिलेने झोपेदरम्यान पडलेल्या स्वप्नामध्ये आपली साखरपुड्याची अंगठी चोरी होण्यापासून वाचविण्यासाठी चक्क गिळून टाकली.

मात्र जेव्हा जाग आली तेव्हा आपण खरोखरच असे केले असल्याचे तिच्या लक्षात आले. जेना इवान्स असे या महिलेचे नाव असून या घटनेबाबत तिने फेसबुकवर एक पोस्ट टाकली आहे. त्यात ती म्हणते की, स्वप्नामध्ये ती आणि तिचा प्रियकर बॉबी एका हायस्पीड रेल्वेमध्ये अतिशय वाईट परिस्थितीत चोरट्यांच्या गराड्यात सापडलो होतो.

त्यावेळी बॉबीने तिला आपली अंगठी वाचविण्यासाठी गिळण्यास सांगितले. २९ वर्षीय जेनाचे डोळे उघडले तेव्हा तिची अंगठी तिच्या बोटात नव्हती. दुसऱ्या सकाळी तिने बॉबीला उठवले व साखरपुड्याची अंगठी गिळल्याचे सांगितले.

तिची ही कहाणी व्हायरल झाली त्यावर लाखो प्रतिक्रिया मिळाल्या आहे. जेनाला झोपेत चालण्याचीही सवय आहे. यानंतर तिला दवाखान्यात हलविण्यात आले. तिथे एक्स-रेमध्ये अंगठी तिच्या पोटात असल्याचे दिसून आले.

त्यामुळे तिला वेदनाही होत होत्या. अखेर २.४ कॅरेट हिऱ्याची ही अंगठी बाहेर काढण्यासाठी जेनाला अपर अँडोस्कोपीला सामोरे जावे लागले. अंगठी पोटातून काढल्यानंतर डॉक्टरांनी ती जेनाला देण्याऐवजी बॉबीकडे सोपविली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment