शेतकऱ्यांवर कालवा फोडल्या प्रकरणी गुन्हा दाखल

Published on -

अहमदनगर : कर्जत तालुक्यातील ताजू येथील १९ शेतकऱ्यांवर कालवा फोडल्याप्रकरणी कर्जत पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी पाटबंधारे विभागात काम करणारे अंबादास निवृत्ती गिरमे यांच्या यांच्या फिर्यादीवरून कर्जत पोलिसांनी ताजू येथील बापू खेत्रू हाके,बाबा कोंडीबा चोरमले,रामदास किसन दराडे,संपत लक्ष्मण दराडे,लक्ष्मण खेत्रू हाके,

बारकू सोनू चोरमले,पर्वतराव खेत्रू हाके,भिवा रावा चोरमले,अजित फिरंगु कोळपे,भिवा चोरमले,शिवाजी गेणा हाके,अंबादास बापू दराडे,पोपट किसन दराडे,देविदास बापू दराडे,नवनाथ बापू दराडे,दिगंबर परशुराम दराडे,

नितीन शिवाजी दराडे,मधुकर लक्ष्मण दराडे,रघु चोरमले सर्वजन रा.ताजू यांच्यावर कालवा फोडून कालव्याचे पाणी वळवून शासनाचे ३ लाख रूपयांचे नुकसान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe