स्मार्टफाेन खरेदी करण्यार असाल तर हे नक्की वाचा…

Published on -

जर तुम्ही स्मार्टफाेन खरेदी करण्याची याेजना आखत असाल तर या सणासुदीच्या हंगामात तुमच्यासाठी सुवर्णसंधी आहे. या वर्षात सणासुदीच्या काळात सॅमसंगपासून Apple पर्यंत आणि शाओमीपासून व्हिवाेपर्यंत अनेक बड्या कंपन्या नवीन फाेन बाजारात आणणार आहेत.

वेगवेगळ्या अहवालानुसार या मंदीच्या वातावरणातही स्मार्टफाेन कंपन्या ७५ नवीन स्मार्टफाेनचे माॅडेल्स बाजारात आणण्याची तयारी करीत आहेत. इंडस्ट्री इंटिलिजन्स ग्रुपचे प्रमुख प्रभू राम म्हणाले, दरवर्षी स्मार्टफाेनच्या आयातीमध्ये ८ ते १० टक्के वाढ हाेईल.

स्मार्टफाेन ब्रँड्सने आकर्षक ऑफर दिल्याने ग्राहकांचे स्वारस्य वाढले आहे. सणासुदीच्या काळात स्मार्टफाेनच्या अनेक बड्या कंपन्यांमध्ये नवीन उत्पादने बाजारात आणण्यासाठी उत्सुक आहेत.

एकीकडे शाओमी रेडनाेट ८ आणि ८ प्राे लाँच करण्याची याेजना आखत आहे तर सॅमसंग एम सिरीजअंतर्गत लाँचिंगची तयारी सुरू केली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe