श्रीगोंदा : सततच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी काल आमदार राहुल जगताप यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन केली. यावेळी द्राक्ष बागांसाह कांदा, बाजरी, मका तसेच कपाशींच्या पिकांची पाहणी केली.
पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे दिसून आले. यावेळी माजी.आ.राहुल जगताप यांनी राज्य तसेच केंद्र सरकार मार्फत नुकसानग्रस्तांना भरपाई मिळून देण्याकरिता प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.

नुकसानग्रस्तांचे पंचनामे पूर्ण करून नुकसानीचा अहवाल लवकरात लवकर शासनाला सादर करावा, त्यानुसार शेतकऱ्यांना तातडीने मदत उपलब्ध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून आग्रह धरण्यात येईल. असे जगताप यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात सांगितले.
आज माजी.आ.जगताप यांनी श्रीगोंदा शहरातील पोपट बोरुडे यांच्या शेतातील कपाशीच्या पिकाची पाहणी केली असता. संपूर्ण कपाशीचे नुकसान झाल्याचे आढळून आले तसेच शेतकऱ्यांच्या कृषी पंपांची बिले न भरल्याने त्यांची जोडणी पुढील पीक येईपर्यंत वीज मंडळाच्या अधिकाऱ्यांनी तोडू नये असे आदेश सरकारने द्यावेत.
अशी मागणी ही यावेळी करण्यात येणार असल्याचे सांगितले. अधिकाऱ्यांनी फक्त नुकसानीचे अहवाल मागविण्याचे आदेश देऊन भागणार नाही तर जिल्हा व तालुका स्तरावरील अधिकाऱ्यांनी तातडीने नुकसानीची प्रत्यक्ष पहाणी करून सरकारला वास्तववादी अहवाल द्यावा. तसेच नुकसान भरपाई मिळून शेतकऱ्यांना दिलासा मिळेल, अशी मागणीही केली आहे.
- अहिल्यानगर : जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील अडचणीत, सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर पोलिसात गुन्हा दाखल !
- रेल्वे प्रवाशांसाठी कामाची बातमी ! तिकीट हरवल्यास काय कराल ? वाचा डिटेल्स
- अब्जावधी रुपये खर्चुनही ग्रामीण भागात टँकरने पाणीपुरवठा
- Ahilyanagar News : सह्याद्रीच्या कुशीतल्या देवरायांना मिळणार संरक्षण, वन विभागाचा ऐतिहासिक निर्णय
- Ahilyanagar Politics : अखेर सभापती राम शिंदे यांनी बाजी मारली ! रोहित पवारांचे वाईट दिवस सुरु…