राहुरी :- श्रीरामपूर तालुक्यातील गोंधवणी येथे माहेरी भाऊबीज करून सासरी निघालेली राहुरी येथील विवाहित महिला व तिची दोन चिमुकली मुले राहुरी फॅक्टरी येथून गायब झाल्याने खळबळ उडाली.
राहुरी फॅक्टरी येथील श्रीरामपूर रोड चौकात रविवारी दुपारी अडीचच्या सुमारास ही घटना घडली. सोनम संजय झावरे (वय २७) असे या महिलेचे नाव असून ती आपली मुले यश (चार वर्षे) व आरूष (अडीच वर्षे) या दोघांना घेऊन माहेरी गोंधवणी येथे भाऊबीजेसाठी गेली होती.

रविवारी दुपारी २ वाजता सोनमचा आपल्या दोन लहान मुलांसह श्रीरामपूर-पुणे बसमधून (एमएच १४ – ४८९९) राहुरीला येत होती.
दुपारी अडीचच्या सुमारास बस राहुरी फॅक्टरी चौकात आल्यानंतर सोनम व दोन लहान मुले खाली उतरले होते. काही वेळाने श्रीरामपूरकडून राहुरीच्या दिशेला जाणारी पांढऱ्या रंगाची तवेरा राहुरी फॅक्टरी चौकात थांबली. या तवेरात तिघे मायलेक बसले.
ही तवेरा राहुरीला न थांबता नगरच्या दिशेला निघून गेली. उशिरापर्यंत सोनम व दोन लहान मुलं घरी न परतल्याने नातेवाईकांनी सोनमचा राहुरी फॅक्टरी येथे शोध घेतला. ताहराबाद चौकात बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फुटेजमध्ये सोनम व दोन लहान मुलं एसटी बसमधून उतरून तवेरामध्ये बसल्याचे दिसले.
रविवारी सायंकाळी नातेवाईकांनी सोनम व दोन लहान मुलं हरवल्याची खबर राहुरी पोलिसांना दिली. सोमवारी सायंकाळपर्यंत सोनम व दोन लहान मुलांचा ठावठिकाणा मिळाला नव्हता.
एसटी बस राहुरी येथे जाणार असताना सोनम व दोन लहान मुलं राहुरी फॅक्टरी येथे कशी उतरली, हा सवाल सर्वांनाच चक्रावून टाकणारा ठरला आहे. सोनमजवळ असलेल्या मोबाइलवर संपर्क साधला असता तो बंद असल्याचा संदेश मिळाला.
- घर किंवा फ्लॅट खरेदी करताना या ५ गोष्टींकडे लक्ष द्या, नाहीतर पैसे बुडण्याचा धोका!
- Ahilyanagar News : पावसात ‘तो’ झाडाखाली थांबला, इतरांनाही गप्पा मारायला बोलावले अन वीज कोसळली, क्षणार्धात मृत्यू…
- पुण्यात स्थलांतर करणाऱ्या महिलांमध्ये ‘या’ जिल्ह्याचा दबदबा ! आकडेवारी ऐकून विश्वास बसणार नाही
- Ladki Bahin Yojana : लाडकी बहिण योजना बंद होणार की सुरू राहणार ? एकनाथ शिंदेंची घोषणा
- Pune Metro : पुणेकरांना मोठा झटका ! बहुचर्चित मेट्रोला होणार इतका उशिर…