राहुरी :- तालुक्यातील टाकळीमियाॅ पंचक्रोशीत सातशे हेक्टरवरील खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले असताना शिवारफेरी करण्याऐवजी खासदार सदाशिव लोखंडे, तसेच महसूल व तालुका कृषी अधिकाऱ्यांनी ग्रामपंचायतीत बैठक बोलावून निव्वळ देखावा केल्याची टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते रवि मोरे यांनी केली.
परतीच्या पावसामुळे टाकळीमियाॅ व देवळाली मंडलामधील ३२ गावांतील खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. बुधवारी खासदार लोखंडे, तहसीलदार फैसुद्दिन शेख, तालुका कृषी अधिकारी ठोकळ यांनी चांदेगाव, लाख, त्रिंबकपूर, मालुंजे भागात पाहणी दौरा आयोजित केला होता.

टाकळीमियाॅ भागात मोठे नुकसान झाल्याने खासदार लोखंडे, तहसीलदार व कृषी अधिकाऱ्यांनी शिवारफेरी करण्याची गरज होती. तथापि, या जबाबदार घटकांनी पाठ फिरवल्याने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई कशी मिळणार? असा सवाल विचारला जात आहे.
टाकळीमियाॅ ग्रामपंचायतीत शेतकऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत चांगलीच खडाजंगी झाली. खासदार लोखंडे म्हणाले, पावसाने नुकसान झालेल्या कपाशी, सोयाबीन, मका या पिकांचे पंचनामे होणार असल्याने शेतकऱ्यांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. दरम्यान, २०१६ मध्ये राहुरी तालुक्यातील ९० टक्के पिकांचे नुकसान झाले होते.
या पिकांचा विमा शेतकऱ्यांनी भरलेला असताना बाजरी वगळता इतर पिकांना विमा कंपनीकडून कुठलीही भरपाई मिळाली नाही. शासन म्हणून खासदार व महसूल, कृषी अधिकाऱ्यांची जबाबदारी असल्याने विमा कंपनीवर कारवाई करून भरपाई मिळण्याबाबत आपण काय केले, असा सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित करताच खासदार लोखंडे, तसेच तहसीलदार व तालुका कृषी अधिकारी निरुत्तर झाले.
- 200MP कॅमेरा + 7600mAh बॅटरी! iQOO 15R चार वर्षे अगदी नवा राहणारा फोन !
- 7000mAh बॅटरी, 50MP ट्रिपल कॅमेरा, 100W फास्ट चार्जिंग, iQOO 15 वर धमाकेदार डिस्काउंट
- रेल्वेसाठी मोठा पॅकेज, वंदे भारत स्लीपर ट्रेनसह अमृत भारत रेल्वेचा विस्तार
- विजय सेल्समध्ये iPhone 16 आता अर्ध्या किमतीत-Limited Offer, एक्सचेंज आणि बँक डिस्काउंटसह उपलब्ध
- साध्या लोकलचे एसी लोकलमध्ये रूपांतर; तिकीट दर किती? आराखड्यासाठी आयआयटीची नियुक्ती













