जामखेड : मला अतिशय आनंद होतोय की, आपल्या आपल्या अवर्षण प्रवण क्षेत्रातील गोरगरीब, वंचित, पीडित, शोषित लोकांना खऱ्या अर्थाने न्याय देण्याचा हेतूने आजचा दिवसाचे विशेष महत्व आहे.
कारण मी काही सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेला माणूस नाही. सालकऱ्याच्या घरात जन्माला आल्याने गरिबी काय असते ते मी अनुभवलेले आहे. म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विविध योजनांमार्फत मिळणाऱ्या अर्थ सहाय्यात भरघोस वाढ करण्याचा निर्णय घेतल्याने आजचा दिवस माझासाठी खूप विशेष आहे.

असे प्रतिपादन पालकमंत्री ना. प्रा.राम शिंदे यांनी आज कर्जत तालुक्यातील कुळधरण येथे एका सोहळ्याप्रसंगी मनोगत व्यक्त केले.
हाय्य देण्याच्या हेतूने संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती योजना आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती योजना या सर्व योजनांमध्ये मिळणाऱ्या अर्थ सहाय्यात भरघोस वाढ करण्याचा निर्णय महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतला आणि याचा लाभ राज्यासह आपल्या भागातील अनेक नागरिकांना होणार आहे.
त्यानिमित्ताने राज्य शासनाचे प्रतिनिधी म्हणून ना. शिंदे यांचा सत्कार केला. तत्पूर्वी कुळधरण येथे कुळधरण ते कर्जत रस्त्याचे भूमिपूजन, जगदंबा देवी मंदिरासमोर पेव्हिंग ब्लॉक बसवणे कामाचे भूमिपूजन तसेच वृद्ध भूमीहीन शेतमजूर नवीन पात्र लाभार्थींना मंजुरी पत्राचे वाटप ना.शिंदे यांच्या हस्ते तसेच कामगार,पर्यावरण, मदत आणि पुनर्वसन, भूकंप पुनर्वसन राज्यमंत्री ना.संजय भेगडे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.